रत्नागिरीच्या पाली खानूमधलं कंपनीच कार्यालय मनसेनं फोडलं; मुंबई- गोवा महामार्गाच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक

राज ठाकरे आणि मनसेनं मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधला हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

    रत्नागिरी : राज ठाकरे आणि मनसेनं मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधला हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मनसेचे राजापुर तालुका अध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उप तालूका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, रत्नागिरीतील पाली खानू मधील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं ऑफीस देखील मनसेनं फोडलं. एकूणच, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

    गेल्या 10 वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये अडीच हजार नागरिकांचा जीव गेला आहे. आजवरच्या बांधकामावर साडेपंधरा हजार कोटी खर्च झाले आहेत. तरीही मुंबई-गोवा महामार्गाचा प्रकल्प अजूनही अपूर्ण आहे अशी टीका राज ठाकरेंनी पनवेलच्या मेळाव्यात केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर कुठे आणि किती खड्डे पडलेत याची माहितीही त्यांनी घेतली.