Raj Thackeray

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray In Nagpur) यांनी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले.

    नागपूरः राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरु होऊन (MNS) १६ वर्ष झाली. मात्र विदर्भात पक्षाचं अस्तित्व फारसं नाही. या विदर्भात पक्षाचा विस्तार झाला नाही. विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छूक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल. त्यासाठी (Nagpur MNS) नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray In Nagpur) यांनी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले.

    नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. सत्तारुढ असलेल्यांना आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

    मनसे पक्षाला विदर्भात नवीन उभारी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये कोणाचा समावेश राहील याबद्दल मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचवेळी जुन्या पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पक्षाचे पद मिरवून स्वतःचा विस्तार करण्याचा काम अनेक पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी खासगीत बोलून दाखवले. तसेच अशा संधी साधूंमुळे आम्ही पक्षापासून दूर गेलो होतो. मात्र आता स्वतः राज ठाकरे यांनी विदर्भात आल्याने पक्षाचा विस्तार नक्की होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.