मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मराठी पाट्या, टोलच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) हेही उपस्थित होते.

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) हेही उपस्थित होते. या भेटीत राज्यातील टोल नाके आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

    टोल नाक्यांच्या प्रश्नावरून राज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातील जनता रोड टॅक्स भरते, मग टोलचा भार कशाला, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना तेव्हा विचारला होता. यानंतर मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांची बैठक पार पडली होती. तसेच, अनेक टोलनाक्यांवर मनसेने बसवलेल्या कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. दुसरीकडे मराठी पाट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    मनसेकडून मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणी तोडफोड करण्यात येत आहे. अशातच राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत टोल, मराठी पाट्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

    वडापाव पाहिला की सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वडा अजित पवार आहे का? की अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वडा एकनाथ शिंदे आहेत…की आणखी वेगळे ! हे समजण्यापलीकडचे आहे.

    – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे