
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेला मोठं महत्त्व आहे. आज झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याच्या धर्तीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला (Gudi Padwa) मेळावा सुरु केला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेला मोठं महत्त्व आहे. आज झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेना पक्ष पाहिला नाही तर जगलो. शिवसेना, धनुष्यबाण तुझं का? माझं? पाहून अतिशय वेदना झाल्या. ती चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार हे माहीत होतं म्हणून त्याचा वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून शिवसेनेतून बाहेर पडलो. हे सगळं राजकारण पाहत असताना मला वाईट वाटलं होतं. लहानपणापासून जे पाहत आलो. माझ्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या. मला शिवसेनाप्रमुख व्हायचं या सर्व अफवा होत्या. धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांनाच झेपू शकतं’.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रात राजकीय चिखल खूप झाला आहे. याआधी असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही. मी 22 तारखेला जे काही आहे ते बोलणार आहे, यावेळी मला जे काही बोलायचे आहे, ते मी बोलणार त्यावेळी सगळ्याचे वाभाडे काढणार असल्याचे राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यात म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी भाष्य केले.