Raj Thackeray

राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावरील हीप बोनची शस्त्रक्रिया (Raj Thackeray Surgery) आज पूर्ण झाली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या करण्यासाठी राज ठाकरेंना शनिवारी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होेते.

    मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावरील हीप बोनची शस्त्रक्रिया (Raj Thackeray Surgery) आज पूर्ण झाली आहे. लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या करण्यासाठी राज ठाकरेंना शनिवारी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होेते.

    ही शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजा आयोजित करण्यात आली होती. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आले आहे.राज ठाकरे यांच्यावर जुनच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

    राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौरा करणार होते. मात्र त्यांना अचानक हीपबोनचा त्रास सुरु झाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला.