दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगलेला आहे. त्यातच मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेच्या दसरा मेळावा नसून ‘टोमणे मेळावा’ असे संबोधले आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे लक्ष्य लागले आहे.

    मुंबई : यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कोण घेणार, यावरून सध्या राजकारण तापले आहे. त्यातच मनसेने (MNS) पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यावर ट्वीट केले आहे.

    दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगलेला आहे. त्यातच मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेच्या दसरा मेळावा नसून ‘टोमणे मेळावा’ असे संबोधले आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे लक्ष्य लागले आहे.

    गजानन काळे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील मेळावा दसरा मेळावा नसून टोमणे मेळावा असल्याचे म्हटले. त्यामुळे मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये असेही काळे यांनी म्हटले आहे.