मराठी पाट्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन हे सरकारचं अपयश – मनसे जिल्हा संपर्क प्रमुख मनदीप रोडे यांची टिका

महाराष्ट्र राज्यात सध्या ईडीचा धुमाकुळ सुरू आहे. काही मंत्र्यांना कारागृहात जावे लागले, तर काहींना राजीनामे द्यावे लागले तर कुणी पळ काढत आहे. मुळात ईडी या सर्वांच्या मागे लागली नसून यांनी सामान्य जनतेचा जो पैसा खाल्ला आहे. जनतेच्या पैशावर जी मौज केली त्याचेच ते पाप आहे. आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. अशी टिकाही त्यांनी केली.

    भंडारा :  मराठी भाषेला मराठी माणसाला प्रथम प्राधान्य मिळायला पाहीजे हा मनसेचा मुळ मुद्दा आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावायला हव्यात. यासाठी मनसे सुरवातीपासून आग्रही आहे. त्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरीकांना आवाहनही केले होते. मराठी पाट्यासंदर्भात नियम १९५६ नुसार राज्यात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसैनिकांनी अनेकदा आंदोलने केली. काही मुजोर व्यवसायीकांना मनसैनिकांनी अद्दलसुध्दा घडविली. तरीही काही जण या नियमांच उल्लंघन करीत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करतांना दिसत नाही. हे राज्य सरकारचं अपयश आहे. अशा शब्दात मनसे जिल्हा संपर्क प्रमुख मनदीप रोडे यांनी टिका केली.

     

    जनतेच्या पैशावर मौज करणा-यांना ईडी चा त्रास

    महाराष्ट्र राज्यात सध्या ईडीचा धुमाकुळ सुरू आहे. काही मंत्र्यांना कारागृहात जावे लागले, तर काहींना राजीनामे द्यावे लागले तर कुणी पळ काढत आहे. मुळात ईडी या सर्वांच्या मागे लागली नसून यांनी सामान्य जनतेचा जो पैसा खाल्ला आहे. जनतेच्या पैशावर जी मौज केली त्याचेच ते पाप आहे. आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. अशी टिकाही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाप्रकारच्या कुठल्याही कारवायांना घाबरत नाही. मनसैनिक हे जनसेवेच्या कामात मग्न असून ते नेहीम याच कामात राहणार असंही ते म्हणाले.