कल्याण पश्चिमेतील लालचौकी स्मशानभूमी समोरील अनधिकृत मजार अशोक शिंदे यांच्या मालकीच्या जागेत आहे. या अनधिकृत बांधकामावर पुढील 8 दिवसांच्या आत तोडण्याची कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन त्याचाच बाजूला राम मंदिर बांधण्यात येईल, असे पत्र महेश बनकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले आहे.
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये समुद्रामध्ये असलेल्या अनधिकृत मजार (Illegal Mazar) हटवण्याबद्दल आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनधिकृतपणे उभ्या असलेल्या मजार हटवण्याची मोहीम मनसे कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. कल्याणमधील लाल चौकी परिसरातील शिंदे मळा येथे अनधिकृतपणाने रस्त्याच्या बाजूला मजार बांधण्यात आली आहे. ती मजार हटवण्यासाठी मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर (Mahesh Bankar) यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे. आठ दिवसांत मजार हटवली नाही तर मजारच्या बाजूला राम मंदिर बांधण्यात येईल, असा इशारा मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी दिला आहे.