आगामी सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर ताकदीने लढणार; ‘या’ नेत्याने केली घोषणा

जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मोठी आहे. पक्ष संघटन चांगले आहे. ते अधिक कट करण्यासाठी लवकरच तालुकानिहाय मेळावे घेऊ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

सांगली : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मोठी आहे. पक्ष संघटन चांगले आहे. ते अधिक कट करण्यासाठी लवकरच तालुकानिहाय मेळावे घेऊ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. याशिवाय आगामी सर्व निवडणूका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर ताकदीने लढणार असल्याची माहिती तानाजीराव सावंत (Tanajirao Sawant) यांनी दिली. दरम्यान, पक्षाचा वर्धापन दिन, मराठी भाषा दिन व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सांगलीत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सावंत म्हणाले, जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढत आहे. अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये येत आहेत. राजसाहेब ठाकरे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी तरुणांनी मोठी फळी तयार होत आहे. अनेक सामाजिक आर्थिक कृषि प्रश्नांवर मनसे ताकदीने आवाज उठवत आहे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात येत आहेत. मुंबई नंतर केवळ सांगली जिल्ह्यात विद्यार्थी सेनेचे सर्वाधिक युनिट सुरु झाले आहेत.

जिल्ह्यात पक्षाने संघटन भांगले आहे ते अधिक बळकट करण्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न केले जातील. त्यासाठी लवकरच जिल्हा दौरा करणार आहे. तालुकानिहाय मेळावे घेण्यात येतील. कार्यकत्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल, असे सांगत सावंत म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणूका मनसे स्वबळावर लढविणार आहे. त्यासाठी पदाधिकारी मनसैनिकांनी कामाला लागावे.

दरम्यान, पदाधिकारी व कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. विद्यार्थी सेनेने जिल्हाध्यक्ष कृष्णा मोहिते, वैभव कुलकर्णी राजेश जाधव दयानंद मलपे, अमित पाटील, कुमार सावंत, संग्राम पाटणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी मनसैनिक गोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती, वर्धापन दिन जोरात साजरा करणार

बैठकीत शिवजयंती, पक्षाचा वर्धापन दिन व मराठा राज्यभाषा दिन जोरात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. याशिवाय विद्यार्थी सेना, रोजगार व स्वयंरोजगार सहकार व टेलिकॉग सेना जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय कम जिल्हाध्यक्षपदी जमिर सनदी यांची निवड करण्यात आल्याने सावंत यांनी सांगितले.