कल्याण- शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सगळा आनंदी आनंदच आहे, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने या कामात अडसर आहे. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम 80 टक्के पार पडले आहे. या रस्ते विकास कामाविषयी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार टीका केली आहे.

    कल्याण: कल्याण शीळ रस्त्याच्या (Kalyan Shil Road) गुणवत्तेबद्दल वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी 5 मार्च 2022 ला तक्रार केल्यानंतर व्हीजेटीआयने (VJTI) ऑडीट केल्यानंतर 30 पॅनल बदली करणे, 64 ठिकाणी तडे गेलेले पॅनल दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काम चालू आहे. मात्र 21 किलोमीटर रस्त्याच्या गुणवत्तेविषयी आनंदी आनंदच आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी  केली आहे. याआधीही अनेकदा या रस्त्याविषयी राजू पाटील यांनी तक्रार केली होती. आताही त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर बोट ठेवलं आहे. टक्केवारीचा हॅशटॅग टाकून रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी सडेतोड टिका केली आहे. सत्ताधाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टरसोबत भागीदारी आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणाचा अंकुश नाही असे बोलले जाते.

    कल्याण-शीळ हा रस्ता चार पदरी रस्ता होता. हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कामातील 20 टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने या कामात अडसर आहे. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम 80 टक्के पार पडले आहे. या रस्ते विकास कामाविषयी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार टीका केली आहे. विधानसभेतदेखील या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न घेतला होता. स्थानिक नागरिक आणि वाहन चालक या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी तक्रार करत असतात. या रस्त्याच्या कामामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि राज्य रस्ते विकास महामंडळास याबाबत धारेवर धरले आहे.

    या रस्ते कामासंदर्भात मनसे आमदार पाटील यांनी तक्रार केल्यानंतर व्हीजेटीआय या संस्थेकडून ऑडीट करण्यात आले होते. दहा किलोमीटरच्या अंतरावरील 30 पॅनल दुरुस्ती आणि 64 ठिकाणी तडे गेलेल्या पॅनल दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. अजून 21 किलोमीटर रस्त्याच्या कामाविषयी काही एक माहिती दिली गेलेली नाही. या 21 किलोमीटर अंतरातही सगळे काही आलबेल असल्याने त्याविषयी उपाहासात्मक सवाल पाटील उपस्थित केला आहे. या रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे.