एनएचएआयच्या ऑफिससमोर मनसेचं आंदोलन, पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते ताब्यात

जवळपास मागील दीड दशकांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) मुद्यांवरून पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक होणार आहे. मात्र, हे आंदोलन  खळ्ळखट्याक पद्धतीने नव्हे तर अभिनव मार्गाने होणार आहे.

    जवळपास मागील दीड दशकांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) मुद्यांवरून पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक होणार आहे. मात्र, हे आंदोलन  खळ्ळखट्याक पद्धतीने नव्हे तर अभिनव मार्गाने होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे तरी प्रशासन जागे होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. याच आंदोलनाचा प्रयत्न म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मुंबई-गोवा महामार्गाबाबत मनसेचं आंदोलन सुरूच आहे. पनवेलमध्ये आज मनसैनिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध केला.
    मनसे कार्यकर्त्यांना अटक
    आज हात जोडून आंदोलन करत आहोत, काम झालं नाही तर हात सोडून आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला आहे. या दरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये मनसे पनवेल महानगर प्रमुख योगेश चिले यांच्यासह इतर मनसे कार्यकर्त्यांचा समावेश आहे. महामार्गावरील खड्डयांमुळे 2500 हजार पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे असे योगेश चीले म्हणाले.