कल्याणमधील शाळेत हिंदूवादी संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक, विद्यार्थ्याचे पोस्ट कार्ड फाडल्याने कडाक्याचा वाद

बजरंग दलाचे संयोजक करण उल्लींगन यांनी सांगितले की, एका दहावीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने पोस्ट कार्डवर काही मजकूर रंगविला होता. त्यात त्याने जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम, जय भवानी असे लिहिले होते.

    कल्याण : कल्याणमधील एका नामांकीत शाळेत शिक्षिकेकडून एका विद्यार्थ्यांचे पोस्ट कार्ड फाडल्याच्या आरोपानंतर हिंदूवादी संघटना तसेच मनसे, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले आहेत. या पाेस्ट कार्डवर जय श्रीराम, जय भवानी असे लिहिले होेते. हिंदूवादी संघटनांनी शाळेत हनुमान चाळीसाचे पठण केले आहे. शाळेत गोंधळाची परिस्थिती असून पोलीस त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

    बजरंग दलाचे संयोजक करण उल्लींगन यांनी सांगितले की, एका दहावीच्या वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्याने पोस्ट कार्डवर काही मजकूर रंगविला होता. त्यात त्याने जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम, जय भवानी असे लिहिले होते. शाळेतील शिक्षिका मंजूलिका नंबियार यांनी या मुलाचे पोस्ट कार्ड फाडले. ही कान्व्हेंट शाळा आहे. इथे असले प्रकार चालणार नाही. असे काही पुन्हा केलेले आढळून आल्यास तुला शाळेतून बाद केले जाईल. या प्रकारच्या घटना या शाळेत वारंवार घडत आहेत. हा प्रकार आमच्या कानावर आला. त्यामुळे आम्ही या शाळेत धाव घेतली आहे.

    पोस्ट कार्ड फाडणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात यावे. शाळेने लेखी माफी मागावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. तसेच त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई शाळेकडून केली जाणार नाही याची लेखी हमी दिली जावी. त्याचबरोबर हा प्रकार करणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेत बजरंग दलासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर कल्याणचे भाजप जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड देखील उपस्थित होते.