file photo
file photo

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, मनसेनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसे या यात्रेत काळे झेंडे दाखवणार आहेत.

    अकोला : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आज अकोल्यात आहे. आज शेगावमध्ये त्यांची शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. मात्र, काल राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांना राजकीय वर्तुळातुन विरोध केला जात आहे. या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे.

    कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या (भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 72 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 12 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. आज राहुल गांधी शेगाव येथील जाहीर सभेला संबोधीत करणारा आहेत. दुपारच्या सत्रात चार वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. मात्र, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, मनसेनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसे या यात्रेत काळे झेंडे दाखवणार आहेत. या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक मनसे कार्यकर्ते अकोल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपटसुंदे लोक महाराष्ट्रात येऊन बोलतात ते आम्ही सहन करणार नाही असं देशपांडे म्हणाले.