मनसेच्या खेडकर यांचे उपनिबंधक कार्यालयात आंदोलन ; वसंतराव नाईक पतसंस्था सभासद प्रकरण

खरवंडी कासार पाथर्डी येथील वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेचे बेकायदेशीररित्या ३२१ सभासदांचे सभासदत्व कमी करून कारवाईच्याविरुद्ध सहाय्यक निबंध पाथर्डी यांनी दिलेला कायम ठेव आदेशाचे अंमलबजावणी करण्यात यावी आणि सभासदत्व कायम केलेल्या यादीचे मूळ प्रत मिळावी.

    अहमदनगर: खरवंडी कासार पाथर्डी येथील वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेचे बेकायदेशीररित्या ३२१ सभासदांचे सभासदत्व कमी करून कारवाईच्याविरुद्ध सहाय्यक निबंध पाथर्डी यांनी दिलेला कायम ठेव आदेशाचे अंमलबजावणी करण्यात यावी आणि सभासदत्व कायम केलेल्या यादीचे मूळ प्रत मिळावी.

    वसंतराव नाईक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स रक्कम भरणा करून घेणे व भरणा केलेल्या सभासदांचे सभासत्व कायम करून ती यादी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली यावेळी देविदास खेडकर, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, बाबा शिंदे, देविदास खेडकर, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे, मनसे नेते नितीन भुतारे, अविनाश पवार, संतोष जिरेसाळ. दत्ता नवले, मारुती रोहकले, प्रदीप पठारे, वैभव जामकावळे आदींसह सभासद उपस्थित होते.

    दरम्यान, खेडकर यांनी सहकारमंत्री सावे यांची भेट घेऊन वसंतराव नाईक पतसंस्थेत सुरू असलेल्या चुकीच्या कामांची माहिती देत सभासदांना न्याय देण्याची मागणी केली आहे.