
उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकात पहाटेच्या सुमारास चार्जिंगला लावलेला मोबाईलच्या बॅटरीचा (Mobile Blast) स्फोट झाल्याने तिघे जखमी झाले आहेत. उत्तम नगर येथील सर्वेश्वर महादेव चौक या ठिकाणी कुटुंबियांनी रात्री झोपताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला.
सिडको : उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकात पहाटेच्या सुमारास चार्जिंगला लावलेला मोबाईलच्या बॅटरीचा (Mobile Blast) स्फोट झाल्याने तिघे जखमी झाले आहेत. उत्तम नगर येथील सर्वेश्वर महादेव चौक या ठिकाणी कुटुंबियांनी रात्री झोपताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला.
शेजारी बॉडी स्प्रेच्या बाटल्यांचादेखील स्फोट झाल्याने घरात असलेले तिघेही सदस्य जखमी झाले आहे. स्फोट इतका भीषण होता की, चारचाकी वाहनांच्या काचांना तडे गेले. शेजारच्यांच्या घराच्या खिडक्यांची अशीच काही परिस्थिती झालेली आहे. यामध्ये तुषार जगताप, शोभा पंडित जगताप, बाळकृष्ण तुळशीराम सुतार हे जखमी झाले असून, यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मोबाईलच्या बॅटरीचा स्फोटाची तीव्रता कमी असते. पण सौंदर्यप्रसाधनासाठी वापरत असलेल्या बाँडी स्प्रे याच्यामुळे हा स्फोट झाला का याचा तपास पोलीस करत आहेत. शोभा जगताप यांच्या सून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. घरात बॉडी स्प्रेसारख्या इतरही बाटल्या होत्या. बॉडी स्प्रेमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्याने हा तीव्र स्फोट झाल्याचे सांगितले जाते.