
मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या अभेपुरी (तालुका वाई) येथील धनंजय राजेंद्र गुरव (वय २५) या युवकाला अज्ञात मोबाईलवरून आलेली लिंक क्लिक केल्याने मोबाईल हॅक करून हॅकरने बँक खात्यातून अडीच लाखांचा गंडा घातला.
सातारा : मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या अभेपुरी (तालुका वाई) येथील धनंजय राजेंद्र गुरव (वय २५) या युवकाला अज्ञात मोबाईलवरून आलेली लिंक क्लिक केल्याने मोबाईल हॅक करून हॅकरने बँक खात्यातून अडीच लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९. ३० च्या सुमारास धनंजयच्या मोबाईलवर अज्ञाताच्या व्हॉटसअॅपवरून एक लिंक आली. सदरची लिंक गुरव यांनी ओपन केली असता त्यांचा मोबाईल हॅक होऊन हॅकरने गुरव याच्या वाईतील स्टेट बँकेच्या शाखेतून तीन लाख २५ हजार ६६८ रुपये काढून घेतले.
दरम्यान त्यानंतर गुरव यांनी संबंधित नंबरवर वारंवार पैसे परत करण्यासाठी फोन केला असता त्याने त्यातील ८० हजार ४३८ रुपये परत केले. व उर्वरीत दोन लाख ४५ हजार २३० रुपये परत न करता उडवाउडवीची उत्तरे देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुरव यांच्या फिर्यादीवरून संबंधित मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक भरणे तपास करत आहेत.