शिरोळात आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

शहरात शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. बाजारातील गर्दीचा फायदा घेत ७ जणांचे हजारो रुपयांचे मोबाईल हातोहात लंपास केले. यामुळे शिरोळ पोलिसांनी मोबाईल चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

    शिरोळ : शहरात शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. बाजारातील गर्दीचा फायदा घेत ७ जणांचे हजारो रुपयांचे मोबाईल हातोहात लंपास केले. यामुळे शिरोळ पोलिसांनी मोबाईल चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

    शिरोळ शहरात सोमवार, बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी विविध ठिकाणी आठवडी बाजार भरला जातो. होते. बाजारात झालेल्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही बाजारात येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल हातोहात लंपास होत आहेत. बाजारात वस्तू खरेदी करण्यात मग्न असलेले नागरिक पाहून त्यांचे मोबाईल खिशातून अलगद उचलले जातात. यामुळे हे मोबाईल चोरटे सराईत असून शनिवारी सायंकाळी बाजारात चांगल्या कंपनीची आणि मोठ्या किमतीचे मोबाईल चोरले आहेत. अशा मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. काही नागरिकांनी मोबाईल चोरीबाबत आज्ञाता विरोधात शिरोळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आठवडी बाजारात गस्त घालून चोरट्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.