
सध्याचे मोदी सरकार हे संविधानाचा अवमान करणारे आहे. असे वारंवार दिसून आले आहे. राजकारण हे मुद्द्यावर चालले पाहिजे. सत्य दाबण्याचे प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. कट्टरवादी प्रवृत्ती लोकशाहीत नको. ती संविधानात बसत नाही, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली.
तासगांव : सध्याचे मोदी सरकार हे संविधानाचा अवमान करणारे आहे. असे वारंवार दिसून आले आहे. राजकारण हे मुद्द्यावर चालले पाहिजे. सत्य दाबण्याचे प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. कट्टरवादी प्रवृत्ती लोकशाहीत नको. ती संविधानात बसत नाही, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षच फोडाफोडीचे प्रकार म्हणजे राजकीय व्यवस्थापनातील चुकीचे पांयडे सुरू केले आहेत. त्याचा खेळ चालला आहे, याला लोकशाही म्हणायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकारण्याचा दर्जा घसरला
ॲड. असीम सरोदे पुढे म्हणाले की, सध्या राजकारणाचा आणि राजकारण्याचा दर्जा घसरला आहे. मार्गदर्शन करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे लोकशाही विरळ होत चालली आहे. माणसा- माणसामध्ये जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती संविधानात नाही. परंतु सध्याच्या कट्टरवादी सरकारने लोकशाहीचा कोणता खेळ सुरू केला आहे हे समजून घेतले पाहिजे. जाणीवपूर्वक संविधानाचे आणि लोकशाहीचे अवमूल्यन करण्याचा घाट घातला जात आहे. हे शहाण्या मतदारांनी ओळखले पाहिजे. कुणाला पाडायचं हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे. असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फडवणीस सरकार यांच्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेचे नुकसान झाले असल्याचे सांगून त्यांनी अनेक दाखले दिले. सांगली जशी विचारवंताची भूमी- तशी विचार जंत ही येथे आहेत. तरुण पिढीला भडकवण्याचे आणि बिघडवण्याचाच उद्योग आहे. जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माणसावर कट्टर वादावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.
लोकशाहीची नैतिकता सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच
पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे. देशावर आणि संविधानावर प्रेम असणारी लोक लोकशाहीत पाहिजेत. राजकारणाचा दर्जा घसरला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. लोकशाही मारून टाकण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पण लोकशाहीला जेवण ठेवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. लोकशाहीची नैतिकता सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी सगज राहिले पाहिजे. असे विचार ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.