महात्मा गांधीजींच्या मार्गावर मोदी चालत आहेत, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

फडणवीस म्हणाले, विनोबाजींनी आहेरेंनी नाहीरेंना द्यायचे असे भुदानाचे काम केले. विषमता , दरी दुर करण्याचे प्रयत्न त्यांनी केली. या संकल्पनेने अनेक लोकांना प्रेरणा मिळाली, भुमिहिन लोकांना भूमी मिळाली. हाच मार्ग पंतप्रधान मोदींनी केला. गॅस सिलेंडरची सबसिडी दीड कोटींनी सोडली, त्यामुळे गरजवंतांना मिळाली.

    मुंबई – समाजाच्या सर्वस्थरातील लोकांना सोबत घेऊन विकासाची जी संकल्पना महात्मा गांधींनी मांडली, दरीद्रीनारायणाची सेवा हीच इश्वरसेवा हे बापूंनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी बापूंचा मार्ग स्वीकारत गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला त्यातून तीन कोटी लोकांना घरे मिळाली, शौचालय, गॅस सिलेंडर दिले. समाजातील शेवटच्या व्यक्तीचे परिवर्तन गांधीजींना अपेक्षित होते तेच परिवर्तन देशात भाजप करीत आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.

    फडणवीस म्हणाले, विनोबाजींनी आहेरेंनी नाहीरेंना द्यायचे असे भुदानाचे काम केले. विषमता , दरी दुर करण्याचे प्रयत्न त्यांनी केली. या संकल्पनेने अनेक लोकांना प्रेरणा मिळाली, भुमिहिन लोकांना भूमी मिळाली. हाच मार्ग पंतप्रधान मोदींनी केला. गॅस सिलेंडरची सबसिडी दीड कोटींनी सोडली, त्यामुळे गरजवंतांना मिळाली.

    फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी, विनोबाच्या देशातील विचार अजरामर, प्रेरणा देणारा आहे. प्रेरक, शिक्षित समाज निर्मित करावी, स्वभाषेत शिक्षण असे गांधी म्हणत होते, तेच काम पंतप्रधान मोदी करीत आहेत. नवीन शिक्षा नीतीत सर्वप्रकारच्या भाषेचे सर्व शिक्षण येणार आहे, त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकीलीचेही शिक्षण स्वभाषेत घेता येणार आहे.