“मोदींची जादू कायम…” ; चार राज्यांच्या निवडणूक निकालांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या चारही राज्यांचे निकाल असून आतापर्यंत अनेक निकालांचे कौल, कोणत्या पक्षाची आघाडी याबाबतची माहिती समोर येत आहेत.दरम्यान, या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    आज मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Results Live Updates), छत्तीसगड (Chhattisgarh Election Results Live Updates), तेलंगणा (Tealanga Election Results Live Updates)आणि राजस्थान (Rajasthan Election Results Live Updates)या चारही राज्यांचे निकाल असून आतापर्यंत अनेक निकालांचे कौल, कोणत्या पक्षाची आघाडी याबाबतची माहिती समोर येत आहेत.दरम्यान,( Election Results Live Updates)या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की तेलंगणात पहिल्यापासून असं चित्र दिसत होतं की ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्याच हाती सत्ता राहील. मात्र राहुल गांधी यांनी सभा घेतली त्यानंतर तिथली स्थिती बदलली. तेलंगणात परिवर्तन झालं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

    “मोदींची जादू कायम ? “
    मोदींची जादू कायम आहे का? या प्रश्नावरही शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. “मी राजस्थान काय किंवा कुठल्याही राज्यात गेलो नव्हतो. त्यामुळे तिथे काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी होती का हे मी सांगू शकत नाही. तसंच इंडिया आघाडीवरही या निकालांचा काही परिणाम होईल असं मला मुळीच वाटत नाही. मोदींची जादू कायम आहे का? हे आपल्याला संध्याकाळी सहानंतर समजू शकणार आहे. आत्ता मोजणी सुरु आहे. त्यामुळे आत्ताच काही म्हणणं घाईचं होईल.सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.

    ते पुढे म्हणाले, “दोन ठिकाणी भाजपाचं राज्य होतं. तिथे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. राजस्थानमध्ये काँग्रेस पाच वर्षे सत्तेवर होती. तिथे नव्या लोकांना संधी देऊ असं राजस्थानच्या लोकांना वाटलं. त्याला साजेसे आत्ताचे कल दिसत आहेत. हे कल आहेत निकाल नाहीत हे लक्षात घ्या. ”