ठाण्याचा मोहम्मद जमाल ठरला ‘महाराष्ट्र श्री’, ठाण्यातील स्वप्नील वाघमारे ‘महाराष्ट्र श्रीमान’ तर विपुल पाटील ‘महाराष्ट्र उदय’

    चिपळूण : येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ आणि शहर शिवसेना पुरस्कृत आयोजित राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बाहेरील मैदानावर रंगली. या स्पर्धेत महाराष्ट्र उदय हा सन्मान ठाण्याच्या विपुल सुनित पाटील, महाराष्ट्र कुमार हा सन्मान मुंबई उपनगरच्या गणेश बाळाराम हरद, महाराष्ट्र किशोर ठाण्याचा मोनीश कांतीलाल कारभारी, ठाण्याच्या स्वप्नील सुरेश वाघमारे याने महाराष्ट्र श्रीमान हा किताब, तर महाराष्ट्र मेन्स फिटनेस हा किताब मुंबई उपनगरच्या विश्वनाथ पुजारी याने पटकाविला. ठाण्याचा मोहम्मद जमाल हा महाराष्ट्र श्रीचा मानकरी ठरला. या स्पर्धेवर ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व राहिले.

    ही स्पर्धा दोन दिवस रात्री उशिरापर्यंत रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख आयोजक व माजी नगरसेवक उमेश सकपाळ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्हा व महाराष्ट्र राज्य शरीर सौष्ठव असोसिएशन या दोन्ही संस्थांनी या स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे दोन दिवस उत्कृष्ट असे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. रविवारी रात्री उशिरा फटाक्यांच्या आतषबाजीत यशस्वी खेळाडूंना गौरविण्यात आले.

    यावेळी आयोजक उमेश सकपाळ, संदेश आयरे, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, डॉ. अभिजित सावंत, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, शरीर सौष्ठव असोसिएशन अध्यक्ष कमलाकर पाटील, कार्यध्यक्ष सदानंद जोशी, उपाध्क्ष सचिन तथा भैय्या कदम, भगवान सावंत, श्रीकांत परब, नंदकुमार तावडे, विजय काटदरे, निलेश केकान, सचिव गिरीश शेट्टी, सहसचिव संतोष मलबारी, विनायक केतकर, सुरेंद्र महाडिक, रश्मी गोखले, प्राजक्ता टकले, राणी महाडिक, विनोद पिल्ले, मंदार लेले, सुकन्या चव्हाण, वसिम चिपळूणकर, समीर कदम, उदय घोसाळकर, यशस्वी व्यावसायिक अजय देवधर, ओंकार नलावडे आदी उपस्थित होते.

    स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ मित्र मंडळाचे मंगेश कदम, सचिन पेंढारी, सुजित प्राकटे, संतोष शिगवण, ज्योतिबा पादील, मिलिंद पाटील, संजय शिगवण, बाळकृष्ण पाकटे, सचिन शिंदे, संकेत पाकटे, प्रसाद परब, मनीष पाकटे, सुरेश पाटी, अभिजित पाटील, ऋतुराज कदम, अभिजित कदम, ऋषिकेश चव्हाण, किरण शिंदे, सौरभ शिंदे, मंगेश शिंदे, शैलेश शिंदे, शेखर शिंदे, दीपक जाधव, विजय शिंदे, प्रतीक शिंदे, किशोर शिगवण, दत्ताराम हुमणे, दिनेश नवरत, ओंकार नवरत, संजय जंगम, स्वप्नील जाधव, स्वप्निल सावंत आदी उपस्थित होते.