So far action has been taken against 113 gangs
Pune Crime

    पुणे : मुलाला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार खंडणी मागणाऱ्या येरवड्यातील मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख आणि त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८८ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

    मुलाला मारून टाकण्याची धमकी

    मोबा उर्फ मोहसीन शेख व मोईन काळू शेख (रा. येरवडा) असे कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार आणि मोहसिन शेख हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, त्यांना एक लाखांची मागणी करीत मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यावेळी यातील तक्रारदारांनी त्याला काही पैसे दिले. यानंतर मोहसिनने वारंवार पैशाची मागणी केली. याप्रकरणी येरवडा पोलीस पोलिसांत गुन्हा नोंद केला होता.

    मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव

    तपासादरम्यान मोहसिन शेख व त्याच्या साथीदाराने खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, धाक दाखवून खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणून लोकसेवकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, हत्यारे जवळ बाळगणे, खुनाचा परावा नष्ट करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.