हाफ मर्डर अन् घरफोड्या करणाऱ्या टोळीवर मोक्का ; आतापर्यंत ५१ संघटित टोळ्यांवर मोक्का कारवाई

तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या व घरफोड्या करणाऱ्या अक्षयसिंह जुन्नी टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ५१ संघटित टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. गुन्हेगार अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय २२, रा. वैदवाडी, हडपसर), कुलदिपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१ रा. बिराजदारनगर, हडपसर) व विशाल उर्फ मॅक्स किशोर पुरेबीया (वय २२, रा. जुना म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी कारवाई केलेल्या टोळीचे नाव आहे.

    पुणे : तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या व घरफोड्या करणाऱ्या अक्षयसिंह जुन्नी टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ५१ संघटित टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. गुन्हेगार अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी (वय २२, रा. वैदवाडी, हडपसर), कुलदिपसिंग उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी (वय २१ रा. बिराजदारनगर, हडपसर) व विशाल उर्फ मॅक्स किशोर पुरेबीया (वय २२, रा. जुना म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी कारवाई केलेल्या टोळीचे नाव आहे.

    अक्षयसिंग जुन्नी व त्याच्या साथिदारांनी काही कारण नसताना तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. तर फ्लेक्स लावण्याचे काम करायचे असेल तर प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली. तेव्हा १ हजार रुपये देण्याचे मान्य केले व सध्या पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी टोळक्याने तरुणाला पकडून ‘तुला फार मस्ती आली आहे, तु कसा हप्ता देत नाही ते बघतो’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत डाव्या डोळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार केले. तर हत्यारे हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहे, तक्रार केली तर मारुन टाकीन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद होता. तपासादरम्यान सराईत गुन्हेगार अक्षयसिंग जुन्नी टोळी तयारकरून गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, घरफोडी, चोरी यासारखे १४ गुन्हे नोंद आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केल्याचे दिसत आहे. तपासात टोळीनिर्माणकरून गुन्हे करत असल्याचे समोर आल्याने या टोळीवर वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल ५१ संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.