Mokka' on gangs snatching jewels from women's necks; 116th Action of Police Commissioner Ritesh Kumar
Mokka' on gangs snatching jewels from women's necks; 116th Action of Police Commissioner Ritesh Kumar

    पुणे : सहकारनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार सनी जाधव व त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील ८२ गुंड टोळ्यांवर कारवाई केली आहे. सनी शंकर जाधव (वय २१, रा. चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सलमान ऊर्फ सल्या हमीद शेख (वय २३, रा. बालाजीनगर), वैभव ऊर्फ बबलु ऊर्फ मनोज विवेक कोठारी (वय २७, रा. धनकवडी) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. जाधव आणि साथीदारांनी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर, काशीनाथ पाटीलनगर, धनकवडी भागात दहशत माजविली होती. खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    जाधव टोळीवर मोक्का कारवाई

    जाधव टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाले यांनी तयार केला व अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील व उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीस पाठविला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजूर दिली. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.