मिरजेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग; ग्रामीण पोलिस दलात खळबळ

मिरज ग्रामीण पोलीस (Miraj Rural Police) ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली. महिला कर्मचाऱ्याचा वारंवार पाठलाग करून सौरव खोत आणि आईने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

    सांगली : मिरज ग्रामीण पोलीस (Miraj Rural Police) ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली. महिला कर्मचाऱ्याचा वारंवार पाठलाग करून सौरव खोत आणि आईने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

    मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आवारात ही घटना घडल्याने महात्मा गांधी चौकी पोलिसात महिला कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. याप्रकरणी सौरव आणि अनिता खोत या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    दरम्यान, ही घटना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर संबंधित महिला पाेलीस कर्मचाऱ्याने महात्मा गांधी चौकीत जाऊन खाेत यांच्याविराेधात तक्रार दिली.