50, 100 रुपये देतो म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पीडित मुलीने आईला प्रकार सांगताच…

अल्पवयीन मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला 50, 100 रुपये देतो, असे आमिष दाखविले आणि तिचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

    अमरावती : अल्पवयीन मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला 50, 100 रुपये देतो, असे आमिष दाखविले आणि तिचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी महादेव रामाजी आंबटकर (38, रा. चांदूर रेल्वे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे एका अल्पवयीन मुलीची आई कामावर गेली होते. ती अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. यावेळी आरोपी महादेव आंबटकर हा मुलीच्या घरात शिरला. त्याने मुलीला 50, 100 रुपये देतो, असे म्हणले आणि तिचा विनयभंग केला.

    यापूर्वीही 22 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलगी घरी झोपली असताना आरोपीने येऊन तिचा हात पकडून विनयभंग केला होता. हा प्रकार अल्पवयीन मुलीने आईला सांगितला. त्यानंतर आईने तळेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महादेव आंबटकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.