प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

गर्मी आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना इतक्यात दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या मानसूनचे आगमन लांबल्याने पुढील दोन दिवस ते तीन दिवस विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्ये हिट वेव्ह चा इशारा देण्यात आला आहे(Monsoon will hit Nagpur on June 16 and a heat wave is expected in many districts of Vidarbha ).

    केरळमध्ये मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर दाखल झाला असला तरी विदर्भात मात्र, 16 जून ला मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक मोहानलाल साहू यांनी वर्तवली आहे.

    यादरम्यान मानसून पूर्व पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दिवसाचे तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जात आहे. तर, रात्री देखील उष्ण वारे वाहत असल्याने तापमानाचा पारा सामन्य पेक्षा 5 डिग्रीने वाढलेला आहे.

    उकाड्यामुळे कुलर आणि वातानुकूलित (एसी) सुद्धा काम करत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागलेले आहेत.