rain

तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

    ‘हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 27 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतरच महाराष्ट्रात मान्सूनची नेमकी तारीख सांगता येईल. महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले की, अंदमानमध्ये 16 मेपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.