A total of 194 players participated in the PYC HDFC Racquet League 2024 tournament; The competition starts today

  पुणे : पप्पू हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत शहरांतून विविध वयोगटांत 200हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.  पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये 10 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होत आहे.

  अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार

  स्पर्धा संचालक दिपक हळदणकर सांगितले की, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वर्गीय पप्पु हळदणकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, यामध्ये नील मुळ्ये, भार्गव चक्रदेव, आरूष गलपल्ली, जय पेंडसे, प्रणव घोळकर, शौरेन सोमण, शौनक शिंदे, ओंकार जोग, संतोष वक्राडकर, उपेंद्र मुळ्ये, प्रिथा व्हरटिकर, प्राजक्ता टिपले हे अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
  एकूण 1,50,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार
  स्पर्धेत एकूण 1,50,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात, तर खुला पुरुष व महिला गट, 39 वर्षांवरील गट एकेरी व दुहेरी अशा गटात होणार आहे.

  या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये स्पर्धा संचालक दिपक हळदणकर, अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, पराग मोकाशी यांचा समावेश आहे.