दिवाळीचा गाेडवा वाढणार, २०० हून अधिक प्रकारची मिठाई बाजारात

दिवाळीचा गाेडवा वाढविण्यासाठी दाेनशेहून अधिक प्रकारची मिठाई बाजारात उपलब्ध झाली आहे. बंगाली, राजस्थानी मिठाईला पसंती अधिक असुन, त्याचबराेबर फरसाण, चिवडा यांची रेलचेल दुकानात दिसत आहे.

    पुणे : दिवाळीचा गाेडवा वाढविण्यासाठी दाेनशेहून अधिक प्रकारची मिठाई बाजारात उपलब्ध झाली आहे. बंगाली, राजस्थानी मिठाईला पसंती अधिक असुन, त्याचबराेबर फरसाण, चिवडा यांची रेलचेल दुकानात दिसत आहे. पारंपारीक फराळाप्रमाणेच दिवाळीच्या कालावधीत विविध प्रकारची मिठाई खवय्यांना भुरळ पाडते.

    सध्या शहरातील प्रसिद्ध मिठाई उत्पादक, इतर शहर आणि जिल्ह्यातील उत्पादकांच्या शाखा, देशपातळीवरील नावाजलेल्या उत्पादकांच्या ‘आऊटलेट’ ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. बहुतेक दुकानदारांनी त्यांच्याकडील उत्पादने हे दुकानाच्या प्रदर्शनी भागात उभ्या केल्या मंडपात ठेवले आहेत. आकर्षक बाॅक्समध्ये असलेल्या या मिठाईची खरेदी अद्याप सुरु झाली नसली तरी पुढील आठवड्यात मागणी वाढेल, असा अंदाज व्यापारी अमित अग्रवाल यांनी व्यक्त केला.

    दिवाळीनिमित्त नागरीक मिठाईचे बाॅक्स एकमेकांना भेट म्हणून देतात. तसेच अनेक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई भेट देतात, यासाठी मिक्स मिठाई बाॅक्स ला ग्राहकांकडून मागणी असते, असेही त्यांनी नमूद केले.

    दाेनशेहून अधिक प्रकार

    पुण्यात पुर्वी महाराष्ट्रीय पद्धतीची मिठाई मिळत हाेती, हळू हळू राजस्थानी आणि बंगाली मिठाईने बाजारात स्थान मिळविले आहे. या दाेन्ही प्रकारच्या मिठाईमध्ये दुध, खवा याचा वापर केला जाताे. लाडू, बर्फी, काजु कतली, रसगुल्ला, लाडू, हलवा, माहीमचा हलवा, चमचम, गुंजिया अशा मिठाईचे सुमारे दाेनशेहून अधिक प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.

    ड्रायफ्रुट मिठाईला पसंती

    दुध, खवा यांच्यापासून बनविलेल्या मिठाईप्रमाणेच ड्रायफ्रुट मिठाईची क्रेझही हल्ली वाढली आहे. काजु, अंजीर, खजुर आदीपासून बनविलेली बर्फी आणि इतर पदार्थाना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. पारंपारीक मिठाईच्या तुलनेत हीची किंमत थाेडी जास्त असते.

    फरसाणात चिवडा असताे जाेरात

    साधारणपणे मिठाईच्या तुलनेत फरसाण ( खारे – तिखट पदार्थ ) यांनाही या काळात चांगली मागणी असते. विशेषत: चिवड्याला अधिक मागणी असते. यामध्ये साधा चिवडा, नवरत्न चिवडा असे दाेन प्रकार पाहण्यास मिळतात. चिवड्याच्या तुलनेत इतर फरसाण वर्गीय पदार्थांना मागणी असते.

    ‘‘ मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक भट्टी ही डिझेलवर चालते. तसेच काही ठिकाणी व्यावसाियक सिलेंडरचा वापर केला जाताे. याच्या किंमतीत झालेल्या वाढीचा परीणाम मिठाईच्या किंमतीवर यंदा पडला आहे. ’’

    - अमित अग्रवाल ( व्यापारी )