ऊसतोड कामगारांना नेणाऱ्या ट्रकचा अपघात, 30 हून अधिक जखमी, तिघं गंभीर

भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडला.

    नाशिक : नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० जण जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री घडली. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

    भिमाशंकर येथील कारखान्यावरुन ऊस तोडणीचे काम करून हे कामगार आपल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील आपल्या घरी परतत होते. नांदगाव – चाळीसगाव रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात आयशर ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह परिसरातील इतरही खासगी डॉक्टरांनी देखील यावेळी अपघातातील जखमींवर उपचार केले.