तळेगावात सोमवारी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी ; ‘हर घर तिरंगा’ अभिनयाच्या नियोजनासाठी उद्या बैठक

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने  'हर घर तिरंगा'  हे अभियान राबविण्यात येत आहे. नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची  सोमवारी (दि. ८)  प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.  या अभियानाच्या नियोजनासाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयात सर्व मुख्याध्यापक यांची बैठक घेणार असलेची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

    तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने  ‘हर घर तिरंगा’  हे अभियान राबविण्यात येत आहे. नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची  सोमवारी (दि. ८)  प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.  या अभियानाच्या नियोजनासाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयात सर्व मुख्याध्यापक यांची बैठक घेणार असलेची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

    -अंदाजे पाच हजार  विद्यार्थी सहभागी होतील
    भारतीय स्वातंत्र्यला ७५  वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशाचा दैदिप्यमान इतिहास नागरिकांच्या मनात तेवत रहावा, या उद्देशाने  विद्यार्थ्यांच्या मनामध्ये  बालपणापासून देशाभिमान रुजावा  म्हणून नगरपालिकेमार्फत शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची  सोमवारी (दि. ८)  प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीमध्ये स्वातंत्र्य संग्रामात  योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा करून अंदाजे पाच हजार  विद्यार्थी सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

    – शाळांमध्ये बाराशे झेंड्याचे वाटप  करणार
    तसेच शहरांमध्ये विविध ठिकाणी नगरपरिषदेच्या मार्फत खाजगी व्यावसायिकांच्या मदतीने झेंडा विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. नगरपरिषद कार्यालयाबाहेर ५ ऑगस्टपासून स्टॉल लावण्यात येणार आहे, तसेच नगरपरिषदेच्या शाळांमध्ये बाराशे झेंड्याचे वाटप करण्याचे नियोजन झाले आहे.  विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये झेंडे उपलब्ध होणार असल्याचेही नगरपरिषद प्रशासनामार्फत कळविले आहे. तसेच  नागरिकांनीही आपल्या घरावर ध्वज फडकवून या राष्ट्रीय अभियानामध्ये मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे,  असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.