मोसंबीला लागलेल्या बुरशी रोगाची, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी

राधाकिसन दिवटे (Radhakisan divate) या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही.

    जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी (jalna ghnsavangi) तालुक्यातील बहिरगड गावात राहणाऱ्या राधाकिसन दिवटे (Radhakisan divate) या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

    दरम्यान, शेतकऱ्यांचे पावसामुळं मोठे नुकसान झाले आहे, यामुळं सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, व शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी असं म्हणत दानवे यांनी राज्य सरकारवर टिका केली. यावेळी सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण, माजी सभापती शिवाजी शिवतारे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे, तालुकाप्रमुख जालना हरिभाऊ पोहेकर, मा. सभापती मधुकर साळवे, भास्कर अंबेकर, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, युवासेनेचे गणेश काळे, रवी शिंदे, संतोष जाधव, शेतकरी व अधिकारी उपस्थित होते.