सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक निधी : डॉ. विश्वजीत कदम

माझा सर्वत्र कृषी व सहकार राज्यमंत्री असा उल्लेख केला जातो. मात्र, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आपल्या जिल्ह्यात आणला आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Dr. Viswajit Kadam) यांनी दिली.

    पलूस : माझा सर्वत्र कृषी व सहकार राज्यमंत्री असा उल्लेख केला जातो. मात्र, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आपल्या जिल्ह्यात आणला आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Dr. Viswajit Kadam) यांनी दिली.

    आमणापूर (ता.पलूस) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात दिली. यावेळी मंत्री डॉ. कदम पुढे म्हणाले, आमणापूरचे सरपंच आणि तरुण सहकारी वैभव उगळे यांच्या पाठपुराव्याने सात कोटी रूपयांचा विकास आणला आहे. येत्या जुलै महिन्यात विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या सात कोटींचे चौदा कोटी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन डॉ. कदम यांनी दिले.

    यावेळी युवक काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे यांनी स्वागत केले. सरपंच विश्वनाथ सुर्यवंशी यांनी आभार मानले. ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातून निवृत्त होणाऱ्या भानुदास नाझरे यांचा राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.

    यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, विठ्ठलवाडीचे सरपंच शरद उगळे, मोहन घाडगे, अशोक अनुगडे, प्रा.प्रमोद जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून उशीरा का होईना पण आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल अडीच तास वेळ दिला. बोरजाईनगर, श्रीराम मळा, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी, आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केले.