Mother and daughter die after falling into well at Dhule

धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून आईसह 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये भिका पवार यांना वाचवण्यात यश आले आहे मात्र या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे(Mother and daughter die after falling into well at Dhule).

    36 वर्षीय सुनीता भिका पवार आणि 10 वर्षीय शाम भिका पवार या मायलेकाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालाय. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आल्यानंतर दोघांचा मृतदेह जेसीबी च्या साह्याने काढण्यात आला.

    या घटनेत भिका पवार यांना वाचवण्यात यश आले आहे. आपल्या शेतातील विहीरीच्या आजू बाजूला बांधण्यात आलेल्या कठड्याला पाणी मारण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते आहेत.