मुलीच्या वागण्याला कंटाळून आईची आत्महत्या; अल्पवयीन मुलीसह फुस लावणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या चुकीच्या वागण्याला कंटाळुन आईने आत्महत्या केली. मुलीच्या आईने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

  कराड : अल्पवयीन मुलीच्या चुकीच्या वागण्याला कंटाळुन आईने आत्महत्या केली. मुलीच्या आईने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. माळवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीसह तिला फुस लावणारा सुरज मारुती धस माळवाडी (ता. कराड) या दोघांवर मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. संशयित सुरज धस फरार आहे.

  अल्पवयीन मुलगी ही संशयित सुरज याचे सोबत फोनवर बोलत असे. घरातील लोकांनी व नातेवाईकांनी वेळोवेळी तिला समजावुन सांगितले होते. फिर्यादीची आई व पत्नी या दोघींनी सुरज धस याच्या घरी जाऊन त्यालाही समजावुन सांगितले होते. त्यानंतरही अल्पवयीन मुलगी हीचे व सुरज याच्या वागण्यात बदल होत नसल्याने फिर्यादीची पत्नी सतत त्याच गोष्टीच्या विचारात तणावात रहात होती.

  दिनांक ४ रोजी फिर्यादी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी फिर्यादीच्या आईने पत्नी दुपारी ४ वाजल्यापासून पासून घरात नाही. कुठे गेली आहे? असे विचारले. नंतर फिर्यादीने सगळीकडे पत्नीबाबत विचारपूस केली. ती कोठेच मिळून आली नाही. त्यामुळे (दि. ५) मसूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती.

  शोध घेत असताना गावचे पोलीस पाटील यांना गावातील तोफिक मुल्ला यांनी फोन करुन त्यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीजवळ एका महिलेची चप्पल व जवळच कागदी चिठ्ठी दिसल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार अधिक तपास करत आहेत.

  विहिरीत आढळला मृतदेह

  फिर्यादीने चप्पल पत्नीची असल्याचे ओळखल्याने पोलीसांनी विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. फिर्यादीने पत्नीचा मृतदेह ओळखला. सापडलेली चिठ्ठी दाखविली. चिठ्ठीतील अक्षर फिर्यादीने पत्नीचेच असल्याचे ओळखले. त्यातील मजकूर वाचून फिर्यादीने स्वतःची अल्पवयीन मुलगी व तिला फुस लावणारा सुरज मारुती धस याच्या विरोधात फिर्यादीच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.