दाम्पत्यास लुटणाऱ्या माय-लेकीस नांदेडमधून अटक

कराड शहर व परिसरात प्रवासादरम्यान हात चलाखी करून वयस्कर दाम्पत्यास लुटणाऱ्या परजिल्ह्यातील माय-लेकीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने नांदेड येथून अटक केली. अरूणा प्रभू मोहिते व दुर्गा प्रभू मोहिते (रा. नांदेड, जि. नांदेड) अशी अटक केलेल्या माय-लेकीची नावे आहेत.

    सातारा : कराड शहर व परिसरात प्रवासादरम्यान हात चलाखी करून वयस्कर दाम्पत्यास लुटणाऱ्या परजिल्ह्यातील माय-लेकीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने नांदेड येथून अटक केली. अरूणा प्रभू मोहिते व दुर्गा प्रभू मोहिते (रा. नांदेड, जि. नांदेड) अशी अटक केलेल्या माय-लेकीची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
    कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत मलकापूर याठिकाणी प्रवासादरम्यान एका वयस्कर दाम्पत्यास या माय-लेकीनी हातचलाखी करून लुटल्याची घटना घडली होती. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याबाबत पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना त्या माय-लेकीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजू डांगे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला.

    कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.

    सीसीटीव्ही फुटेजद्वारे घेतला शाेध
    पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या माय-लेकीचा शोध सुरू केला. त्या दोघींची भाषा परजिल्ह्यातील होती. या माहितीच्या आधारे राजू डांगे यांनी सीसीटीव्ही फुटेज राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना पाठवून शोध घेतला असता, अरूणा व दुर्गा मोहिते नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे कराड शहर गुन्हे अन्वेषण पथकाने नांदेड येथून माय-लेकीला अटक केली.