असं ‘काय’ घडलं की आईनंच दिली स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी!

नांदेड जिल्ह्यात बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. ज्यात सख्ख्या आईनेच पोटच्या मुलाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    नांदेड : नांदेडच्या बारड येथील १४ ऑगस्टला (Nanded Murder)  एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. सख्या आईनेच मुलाला मारण्याची सुपारी देऊन त्यांला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    नांदेड जिल्ह्यातील बारड येथे 14 ऑगस्टला सुशील नामक युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी बारड पोलिसांनी छडा लावत या खूनामागे मृताची आईच असल्याचे समोर आलं आहे. सुशील हा दारु पिऊन नेहमीच घरी आई-वडिलांना मारहाण करत त्रास देत होता. त्याच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून आईने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेत आईने आपल्याकडे असलेल्या भाडेकरु राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना 50 हजार रुपयांची सुपारी देऊन सुशीलचा खून करण्यास सांगितलं होतं. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांनी खूनाची कबुली दिली. या हत्या प्रकरणात मृत सुशीलच्या आईनेच हा खून घडवला असल्याचं समोर आलं आहे.