
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात एक विचित्र घटना घडली. दारू पिऊन एक मुलगा आपल्या आई-वडिलांना रोज त्रास द्यायचा. मात्र त्याने रविवारी मध्यरात्री जे केलं ते ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.
हिंगोली: हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दारुड्या मुलाने आपल्याच आईवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नराधम मुलाने आधी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर वडिलांच्या समोरच आईवर बलात्कार (Rape On Mother) केला. याप्रकरणी दारुड्या मुलावर हिंगोलीच्या करमनुरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलाला अटकही करण्यात आली आहे. (Hingoli Crime News)
दारू पिऊन पालकांना रोज द्यायचा त्रास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात विचित्र घटना घडली. बलात्कार प्रकरणातील आरोपी मुलाला दारु पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो आपल्या आई-वडिलांना रोज त्रास द्यायचा. मात्र त्याने रविवारी मध्यरात्री जे केलं ते ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. या नराधम मुलाने आपल्याच आईवर अत्याचार केला.
रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. तो घरी आला त्यावेळी त्याचे आई-वडील झोपलेले होते. त्याने आई- वडिलांना उठवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तो भांडायला लागला. दारुसाठी पैसे देत नसल्याने आरोपीला राग आला आणि त्याने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले. तसेच त्यांच्यासमोरच स्वतःच्या 54 वर्षांच्या आईवर अत्याचार केले. जन्मदात्या आईवर आरोपी मुलगा अत्याचार करत असल्याचे पाहून वडिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. मात्र आरोपी हा वडिलांना मारहाण करु लागला. दारूच्या नशेत त्याला कसलंही भान नव्हतं.
पोलिसांनाही बसला धक्का
जन्मदात्या आईवर मुलाने अत्याचार केल्याच्या घटनेमुळे हिंगोली जिल्हा हादरला आहे. पोटच्या लेकाने अत्याचार केल्यावर पीडित महिलेने पतीसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. करमनुरी पोलीस ठाण्यात गेल्यावर पती-पत्नीने आपल्या मुलाने केलेल्या अत्याचाराविषयी सांगितलं. सगळं ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. दरम्यान यावेळी महिला पोलिसांनी पीडित महिलेला धीर दिला. तसेच तात्काळ आरोपी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.