Motorcycle thief arrested in Sarai, 2 lakh 10 thousand items seized

२७ एप्रिल रोजी फिर्यादी मनोज मनोहर देवनाथ (३७) रा. क्रिष्णनगर, चंद्रपूर यांनी झांझरी कॉम्पलेक्स इंडस्ट्रीयल बॅंक समोर दुचाकी पार्क करून बॅंकेत पैसे जमा करण्याकरिता गेले असता त्यांची दुचाकी चोरट्याने पळविली होती. दरम्यान त्यांनी याची तक्रार रामनगर पोलिसांत दिली.

    चंद्रपूर : अलिकडे मोठ्या प्रमाणात शहर व लगतच्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान २७ एप्रिल रोजी शहरातील वर्दळीच्या झांझरी कॉम्प्लेक्स परिसरातून दुचाकी गाडी चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवून एका सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून एकूण सात मोटार सायकल वाहनांसह २ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतुल विकास राणा (२३) रा. श्यामनगर, भगतसिंग चौक, चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    २७ एप्रिल रोजी फिर्यादी मनोज मनोहर देवनाथ (३७) रा. क्रिष्णनगर, चंद्रपूर यांनी झांझरी कॉम्पलेक्स इंडस्ट्रीयल बॅंक समोर दुचाकी पार्किंग करून बॅंकेत पैसे जमा करण्याकरिता गेले असता त्यांची दुचाकी चोरट्याने पळविली होती. दरम्यान त्यांनी याची तक्रार रामनगर पोलिसांत दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी आरोपी अतुल विकास राणा यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने विविध ठिकाणाहून सात दुचाकी वाहने चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीकडून २ लाख १० हजार किंमतीचे एकूण सात वाहने जप्त करण्यात आली असून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्शल अेकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. राजनिकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पेतरस सिडाम, मरस्कोल्हे, विनोद यादव, किशोर वैरागडे, निलेश मुडे, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, पांडुरंग वाघमोडे, सतीश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, सुजीत शेंडे, भावना रामटेके व रामनगर डीबी पथकाने केली.