Movements speed up in BJP for Rajya Sabha seats; Devendra Fadnavis and Pankaja Munde's meeting, what is really going on behind the scenes?

काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड समोर आली, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोड घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपच्या गोटात जोरदार हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार सुरू असतात. पंकजा मुंडे यांनी याआधी अनेकदा आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईला का? अशी चर्चा वारंवार समोर येत असते. त्यामुळे पंकजा यांना राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते, अशी सातत्याने चर्चा होत राहते. आता राज्यसभेच्या जागा खाली असताना, भाजपकडून कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यावरूनच पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

    राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत

    त्यांना मराठावड्यामधील वंजारी समाजाचा मोठा पाठिंबा आहे. याशिवाय त्या माजी महिला आणि बालविकास मंत्री देखील होत्या.  पण तसं फार होताना दिसत नाही. पण यावेळी काहीशा वेगळ्या घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे यांचं नावही चर्चेत आहे. कदाचित त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते.

    पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन होणार……..

    पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून नरमाईची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मध्यंतरी पंकजा या वेगळा निर्णय घेतात की काय? अशी चर्चा सुरु होती. पण पंकजा मुंडे यांनी आपण भाजप पक्षातच राहणार असा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे या भाजपचं केंद्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे कदाचित यावेळी पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

    नेमक्या घडामोडी काय घडल्या?
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी ही भेट घडून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा मुंडे या काल रात्री (6 फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. यावेळी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. पंकजा मुंडे या केंद्रात भाजपच्या पक्ष संघटनेचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून सर्व उमेदवारांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. त्यातूनच पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट येणार
    येत्या राज्यसभेच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता भाजप तीन जागांवर सहज विजयी होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट प्रत्येकी एक जागावर निवडून येऊ शकतात. तर सहाव्या जागेसाठी चुरस असण्याची शक्यात आहे. या जागेवर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार उभा राहिला तरी केवळ 30 मतं पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 12 ते 15 मतं कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर बिनविरोध निवडणूक होईल, अशी चर्चा होती. पण आता भाजप त्या जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची नुकतीच बैठकही पार पडली होती. त्यामुळे याबाबतच्या आगामी काळातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.