‘घराणेशाहीच्या पुढे जात, सत्यजित तांबेंचा विचार जनतेनं करायला हवा’, निलंबित काँग्रेस नेते सुधीर तांबे यांचे मतदानानंतर काय आवाहन?

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने मतदान केले आहे. यामध्ये त्यांचे वडील डॉ सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे, आणि पत्नी मैथिली तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मी गेल्या 15 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात सतत काम करत आहे, याचा चांगला प्रतिसाद सत्यजितला मिळत आहे . सर्वच लोक आमच्या सोबत आहेत.

    अहमदनगर –  नाशिक पदवीधर च्या निवडणुकीला सुरुवात झाली असून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने मतदान केले आहे. यामध्ये त्यांचे वडील डॉ सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे, आणि पत्नी मैथिली तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मी गेल्या 15 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात सतत काम करत आहे, याचा चांगला प्रतिसाद सत्यजितला मिळत आहे . सर्वच लोक आमच्या सोबत आहे. व घरानेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजीत साठी जनतेने विच्यार करायला हवा असे सुधीर तांबे यांनी सांगितले आहे.

    निवडणूक तुल्यबळ ठरण्याची शक्यता

    काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यावर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी नाट्यमयरीत्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे प्रारंभीच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फीच समजली जात होती. मात्र, ठाकरे गटाने अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची खेळी करीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालेल्या पाटील यांच्यासाठी नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील मतदार तांबेंच्या तुलनेत नजीकचे असल्याने ही निवडणूक तुल्यबळ ठरण्याची शक्यता आहे.