anil bonde and pradyasingh thakur

साध्वी प्रज्ञा सिंग (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी हिंदूंनी घरात शस्त्र (Weapons At Home) वापरावे, असं म्हटलं होतं. त्या वक्तव्याला अनिल बोंडे यांनी समर्थन दिलं आहे

    अकोला : स्वसंरक्षणासाठी (self defense) प्रत्येकाजवळ शस्त्र असायला हवं. आज हिंदूंची अशी परिस्थिती आहे की तो जर दुर्जनांपासून आपल्या माता-भगिनींचं संरक्षण करु शकणार नसेल तर तो षंढ आहे. आपल्या संपत्तीचं, संततीचं आणि माता – भगिनींचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. घरात शस्त्र असणं वाईट नाही, असं वक्तव्य खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे. साध्वी प्रज्ञा सिंग (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी हिंदूंनी घरात शस्त्र (Weapons At Home) वापरावे, असं म्हटलं होतं. त्या वक्तव्याला अनिल बोंडे यांनी समर्थन दिलं आहे.

    अनिल बोंडे म्हणतात की, स्वसंरक्षणासाठी शस्त्र हे प्रत्येकाजवळ असलंच पाहिजे.आपल्या संपत्तीच, आपल्या संततीच,आपल्या माता भगिनींचं रक्षण करण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे स्व-संरक्षणासाठी घरात,हातात शस्त्र असणं काहीच वाईट नाही. त्यामुळं साध्वीजींनी जे म्हटलंय की घरात शस्त्र असलंच पाहिजे. साप घरात आला तर ठेचायला काठी असलीच पाहिजे. या गोष्टीचं मी समर्थ करत असल्याचं बोंडे यांनी सांगितलं.

    प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या ?
    प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या की, लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखे उत्तर द्या. तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. मुलींना सुसंस्कृत ठेवा. घरी शस्त्र नसेल तर भाजी कापण्यासाठीचा चाकू धारदार ठेवा. त्यामुळे आपणही भाजी कापण्यासाठीच्या सुऱ्या धारदार ठेवल्या पाहिजेत. कधी संधी येईल माहित नाही. आपली भाजी चांगली कापली की शत्रूंचे तोंड आणि शीरही चांगले कापले जातील.

    हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. हिंदू समाजाला किमान त्यांच्या घरात चाकू (Knife) ठेवण्याचा सल्ला दिला आणि प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले. तसेच, त्यांना जिहादची परंपरा आहे. बाकी काही नाही तर ते लव्ह जिहाद (Love Jihad) करतात. प्रेम असले तरी त्यातही ते जिहाद करतात. आपणसुद्धा प्रेम करतो, आपण देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो, असे त्या म्हणाल्या.