पोस्ट विभागाने खोडा घातल्याने पनवेलच पासपोर्ट कार्यालय लांबल्याचा खासदार बारणेनचा दावा

पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आपण अपयशी ठरल्याचेच खासदार बारणे यांनी मान्य केले असल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.

    पोस्ट विभागाने खोडा घातल्याने पनवेलचे पासपोर्ट कार्यालय लांबल्याचा दावा मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केला आहे. खासदार बारणे यांचा हा दावा म्हणजे आपल्या अपयशाचा खापर पोस्ट विभागाच्या माथ्यावर फोडण्याचा प्रकार आल्याचा आरोप शिव सेना ( ऊबाठा ) गटाचे तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी केला असून, पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आपण अपयशी ठरल्याचेच खासदार बारणे यांनी मान्य केले असल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.

    आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे पनवेलमध्ये लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरु होईल अशी घोषणा खासदार बारणे यांनी 2017 साली केली होती. बारणे यांच्या या घोषणेमुळे ऑनलाईन प्रक्रिये नंतरही पासपोर्ट बनवण्यासाठी ठाणे पासपोर्ट कार्यालयात मारावी लागणारी फेरी कमी होईल अशी अपेक्षा रायगडमधील नागरिकांणी व्यक्त केली होती. पासपोर्ट कार्यालयच्या घोषणेनंतर पोस्ट कार्यालयाने जागे अभावी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास खोडा घातल्याने मंजुरी नंतरही पनवेल करांचे हक्काचे कार्यालय सुरु करण्यात विलंब लागला असल्याचे विधान खासदार बारणे यांनी गुरुवारी ( ता.7) पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

    सरकारच्या अख्त्यारीत असलेले पोस्ट विभाग लोकप्रतिनिधीना जुमाणात नसल्याची एक प्रकारे कबुलीच खासदार बारणे यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे रायगड करांसाठी जिल्ह्यातच पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी मागणी जिल्यातील रहिवाशांची होती. रहिवाशाची ही मागणी लक्षात घेत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्या नंतर जिल्यातील नागरिकांसाठी अलिबाग येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. पनवेल मधिल कार्यालय मात्र अद्यापही रखडलेले आहे.