jaykumar gore

सातारा जिल्ह्यात भाजपने सातारा व माढा मतदारसंघासाठी मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. जिल्ह्यात हा पक्ष सर्वात मजबूत ठरला असून, प्रतिस्पर्धी या तयारीला पुरेसे उरणार नाहीत. पक्षाच्या विविध धोरण व बांधणीच्या माध्यमातून भाजपची दोन्ही मतदारसंघात जोरदार तयारी आहे.

    सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपने सातारा व माढा मतदारसंघासाठी मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. जिल्ह्यात हा पक्ष सर्वात मजबूत ठरला असून, प्रतिस्पर्धी या तयारीला पुरेसे उरणार नाहीत. पक्षाच्या विविध धोरण व बांधणीच्या माध्यमातून भाजपची दोन्ही मतदारसंघात जोरदार तयारी आहे. त्यामुळे २३४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सातारा व माढा लोकसभेमध्ये भाजपचाच उमेदवार असणार आहे, असे माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

    येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. माण व खटाव तालुक्यात पाच वर्षांमध्ये दुष्काळ पुसून टाकणार असून येत्या २५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिहे कटापूरच्या सिंचन योजनेच्या उ‌द्घाटनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    गोरे म्हणाले, माण खटाव तालुक्यातील दुष्काळ हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातील जिहे कटापूर सिंचन योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात आहे. या योजनेच्या आंधळी धरणातील पाण्याचे पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी भावना होती. वकील लक्ष्मणराव इनामदार पंतप्रधान मोदी यांचे राजकीय गुरु होते. त्यांचेच नाव या योजनेला देण्यात आले आहे.

    आमच्या पक्षाचाच उमेदवार

    माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर हे खासदार होऊ नयेत, यासाठी झालेल्या राजकीय प्रयत्नासंदर्भात त्यांना विचारले असता गोरे म्हणाले, त्यावेळी ते आमच्याबरोबर नव्हते तरी रणजितसिंह खासदार झाले. तेव्हाही खासदार भाजपचाच होता आणि आताही भाजपचाच असणार आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात भाजप सक्षम आहे. त्यामुळे येथील उमेदवार आमच्याच पक्षाचा असणार आहे, असा स्पष्ट दावा त्यांनी केला.