महागाईच्या प्रश्नांवर  खासदार जावडेकर निरुत्तर  ; पत्रकार परिषद गुंडाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या कामाचे भरभरून काैतुक केले. मात्र महागाईच्या प्रश्नावर माेघम उत्तर देत त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

    पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या कामाचे भरभरून काैतुक केले. मात्र महागाईच्या प्रश्नावर माेघम उत्तर देत त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षात केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासासठी भाजपने देशपातळीवर ‘हर घर अभियान’ सुरु केले आहे. विविध नेत्यांच्या पत्रकार परीषदांचे आयाेजन करणे, पुस्तिकांद्वारे नागरीकांपर्यंत ही माहीती पाेचविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली. पंतप्रधान मोदी यांनी विकासाचे राजकारण केले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसल्याचा दावाही जावडेकर यांनी केला. माेदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामाचा उहापोह केला. सुमारे एक तासभर जावडेकर यांनी योजनांची माहिती दिली. त्यांनतर सादरीकरणाने काही योजनांची माहिती दिली. सादरीकरणानंतर पत्रकारांनी पहिलाच प्रश्न गॅस आणि पेट्रोल दरवाढी संदर्भात विचारला.
    त्यावर जावडेकर म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या किंमती आंतर राष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. युक्रेन आणि रशिया देशांमधे सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर तेजीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेतृत्व करत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्ध परिस्थीतीवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी मध्यस्ती करावी अशी त्यांची इच्छा आहे. युद्ध विराम झाल्यावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतील. त्याचा परिणाम हिंदुस्थानातील तेलाच्या किंमती कमी होण्यावर होईल. असे सांगत जावडेकर यांनी पत्रकारांच्या महागाई, बेरोजगारीच्या पुढील प्रश्नांना उत्तरे न देता पत्रकार परिषद उरकती घेतली.