काश्मीरात हनुमान चालिसा पठण करेन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चॅलेंज खासदार नवनीत राणा यांनी स्वीकारले

औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा प्रकरणांवर बोलताना त्यांनी, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे म्हटले होते. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे(MP Navneet Rana accepted Chief Minister Uddhav Thackeray's challenge).

    मुंबई : औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा प्रकरणांवर बोलताना त्यांनी, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे म्हटले होते. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे(MP Navneet Rana accepted Chief Minister Uddhav Thackeray’s challenge).

    काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

    मंदिर, हनुमान चालीसा पठण आपल्याला महत्वाचे वाटत नसेल, तर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणून कसं काय रिप्रेझेंट करू शकता, असे म्हणत नवनीत राणांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करावे, असेही राणा म्हणाल्या.

    खासदार नवनीत राणा म्हणाल्या, काल त्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्यांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते, पण त्यांनी मला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान दिले. त्यांनी तेथील जनतेच्या समस्यांवर, पाणी प्रश्नावर का नाही चर्चा केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    काश्मीरमधील टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितप्रकरणावर बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशवासीयांसोबत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पाऊल हे सरकार उचलत आहेत. जनतेला त्यांच्यावर विश्वास असून देशभरातील नागरिक त्यांच्यासोबत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.