ओमराजे – राणा जगजितसिंह यांच्यात खडाजंगी

ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत ''ए तु निट बोल तुमची संस्था आणि तुमची औकात मला सर्व माहित आहे. औकातीत राहा.

    उस्मानाबाद – खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पीकविम्याच्या मुद्यावर त्यांच्यात हमरी- तुमरी झाली आणि अरे तुरेची भाषाही उभयतांनी वापरली. हा प्रकार उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी घडला.

    ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत ”ए तु निट बोल तुमची संस्था आणि तुमची औकात मला सर्व माहित आहे. औकातीत राहा.

    जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील आणि निंबाळकर परिवारात जूना राजकीय वाद आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्याची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात राणा जगजितसिंह पाटील हे एकटेच होते. शेतकऱ्यांच्या मागणीवर खासदार ओमराजे निंबाळकर तिथे पोहचले. जिल्हाधिकारी यांना त्यांनी काही प्रश्न विचारले.

    राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांना टोकले. त्यानंतर तू बाळ आहेस असा उल्लेख केला. यावरुन संतापलेल्या ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांना औकातीत राहण्याची भाषा वापरली. यादरम्यान त्यांच्यात मोठा वादही झाला. एकमेकांना हमरी – तुमरीची भाषा वापरली गेली.