महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये कोणताही गट नाही- खासदार प्रतापराव जाधव

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्याला खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाण जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सिंदखेड राजा येथेही भेट दिली.

    बुलडाणा : महाराष्ट्र मध्ये शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही शिवसेनेमध्ये नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने हिंदुत्वापासून शिवसेना दूर जात होती. शिवसेनेची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे. त्या महायुतीमध्ये आम्ही आहोत. अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली.

    शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्याला खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाण जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सिंदखेड राजा येथेही भेट दिली. यावेळी त्यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे दर्शन घेतले आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,माजी आमदार डॉ.शंशिकात खेडेकर, युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव  आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट याबद्दल प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्र मध्ये शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही शिवसेनेमध्ये नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.