‘शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेबांना शोभून दिसते, उद्धव ठाकरेंनी…’ शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराचं विधान

शिवसेना पक्षफुटीनंतर (Shivsena) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) तयार केला. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहेत. त्यात आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

    मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर (Shivsena) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) तयार केला. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहेत. त्यात आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. ‘शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसते, उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची’, असा आरोप शेवाळे यांनी केला.

    राहुल शेवाळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसते. त्यांच्या पश्चात ते पद आम्ही गोठवले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण केले. तशी पक्षाच्या घटनेतही नोंद केली गेली. उद्धव ठाकरे आणि सचिवांनी मिळून सर्व नियुक्त्या केल्या. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून काहीच नियुक्त्या झाल्या नाहीत, असा आरोपही शेवाळे यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्यांना माहिती नाही हे अगदी दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेत अजून कोणतीच निवडणूक झाली नाही, त्यांनी सांगितले तशी प्रक्रिया झाल्याचे त्यांनी सिद्ध करावे, ही पत्रकार परिषद केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी घेतलयाचा आरोपही त्यांनी केला आहे.

    शिवसैनिकाला भाजपने मुख्यमंत्री केलं

    उद्धव ठाकरेंनी ज्या मागणीसाठी युती तोडली ती अडीच वर्षे शिवसैनिकाला भाजपने मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे त्यांची मागणी आता काही राहिली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे सर्वात आधी 16 जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा, अशी आमची मागणी आहे.